मांस हे लवकर खराब होऊ शकते. ते फार वेळ ठेवले गेले आणि तपमान पुरेसे कमी नसले तर त्यात जीवघेणे जंतु पैदा होतात आणि ते खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. तीच गोष्ट नीट शिजवले नाही तरी होऊ शकते.
विशेषतः उष्ण प्रदेशात हे जास्त होऊ शकते. शाकाहाराच्या बाबतीत हा धोका कमी आहे. फळे, धान्ये, भाज्या थोड्या जास्त टिकतात. तितक्या घातक नसतात. ह्या बाबतीत शाकाहार निःसंशय उजवा आहे.


कदाचित म्हणून हिंदू संस्कृतीत शाकाहाराला जास्त महत्त्व आले असेल.
धार्मिक मुस्लिम आणि ज्यू लोकांमधे मांस बनवताना काही पथ्ये पाळावी लागतात (हलाल आणि कोशर) ती अशाच कारणामुळे असावीत.