अनु,

कविता व लिहीलेला प्रतिसाद दोन्हीही आवड्ले.असेच लिहीत रहा.

लग्न हा आयुष्यातला महत्वाचा टप्पा, योग्य जोडीदाराची साथ सारे काही सुलभ करते. माझा अनुभव हा असा आहे-

 

माझ्या आहेत खूप खाण्याच्या आवडीनिवडी

म्हणून देते मी  पदार्थांना कवितेची फोड्णी

तिर किट धुम वाजतात ह्याच्या तबल्याचे बोल

तालवर नाचले तरच राही बांधा सुडोल

आमचे हे आहेत सायंटिस्ट

 पण रुटिन ओवरराईड करुन  मी केला आहे घरचा प्रोग्रम फ़िक्स

सहा झाली की  म्हणतात हे लग्नाला झाली वष्रे सात

त्यांच्या कारवायांना आहे आता चिमुरडीचीही साथ

ते पाहता जाते मस्तकात माझ्या तळ्पायाची आग

तेव्हा दोघे करतात ओम शांती ओम च जप

फणकारुन मी म्हणते आता बसता की नाही गप

बंदा हाजिर है असे म्हणत

ठेवतात हे हातात आईसक्रिम चा कोन

असा आहे आमचा प्रेमाचा त्रिकोण !!!