माझ्या मते योगेशसाहेबांना हेच अपेक्षित आहे. जे तुम्ही ईथे मांडले आहे तेच शाकाहारींबद्दलही बरोबर आहे. 'मी इतर प्राणी मारले जाऊ नयेत म्हणून शाकाहार करतो' हे समर्थन देणेही तेवढेच चुकीचे आहे. 'मला आवडते म्हणून खातो' असे सांगितल्यास त्यात काही गैर नाही.
मी जेवढ्या मांसाहार करणाऱ्या व्यक्तिंना त्याचे कारण विचारले, त्यांच्याकडून मला एकच उत्तर आले आहे - 'एकदा चव तर घेउन बघ'!. मला आजवर कोणीही 'प्रथिने आणि लोह मिळवण्यासाठी मांसाहार करतो' असे उत्तर कोणीही दिलेले नाही. पण बहुतांश शाकाहारी माणसांकडून मात्र वरील समर्थन ऐकले आहे.
शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे स्वतःचे मत दुसऱ्यावर लादण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.
--ध्रुव.