. माझ्या मते धारिणी व संचिका हे दोन्ही शब्द स्वीकारार्ह संस्कृतोद्भव शब्द आहेत. मात्र हिंदीत वापरल्या जाणारे शब्दच मराठीत वापरल्यास त्याचा मराठी भाषेस अंतिमतः फायदा होईल असे मला वाटते. म्हणून मी संचिका हा शब्द वापरला. याबाबत तुम्हाला काय वाटते?

की बोर्ड साठी कळफलक हा शब्द माझ्यामते कुंजीपटापेक्षा जास्त प्रचलित आहे. इथेही माझी निवड हिंदीत वापरलेल्या शब्दास प्राधान्य देऊनच मी केलेली आहे. तुम्हाला असे प्राधान्य देण्याबाबत काय वाटते?

--------- हिंदीत वापरले जाणारे शब्द मराठीतही उपलब्ध असतील तर ते तसे वापरल्याचा फायदाच होईल हे मला पटते. संचिका हा शब्द फाईलसाठी वापरणे त्यामुळे पटते. मात्र फलका ऐवजी पट चालू शकले तरी कुंजी हा कळ ह्या अर्थी शब्द मराठीत अस्तित्त्वात आहे अथवा नाही, मला शंका आहे. मी तरी कुंजी हा शब्द मराठीत ऐकल्या-वाचल्याचे आठवत नाही.

झलकी ऐवजी वानगी हा शब्द चपखल आहे.

तथ्य आणि वास्तवातील फरक माझ्यामते असा - उदाहरणार्थ "आजकाल राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली आहे" हे वाक्य वास्तव दर्शवित असले तरी ते तसे असणे योग्य नाही म्हणून त्यात तथ्य नाही. माझ्यामते तथ्यामध्ये योग्यता अंतर्भूत असते तशी वास्तवात असतेच असे नाही.

इतर काही शब्दांबद्दलची मते नंतर लिहीन.