'मी इतर प्राणी मारले जाऊ नयेत म्हणून शाकाहार करतो' हे समर्थन देणेही तेवढेच चुकीचे आहे.

का चुकीचे आहे बरे? आतापर्यंत आलेले कोणते असे मुद्दे आहेत की ज्यामुळे असा निष्कर्ष निघाला?

उलट जे लोक मुख्यतः शाकाहारी आहेत (शाकाहारी हिंदू, जैन आणि बौद्ध) त्या सर्वांची हीच मान्यता आहे की प्राण्यांची हत्या करायची नाही म्हणून मांसाहार करायचा नाही.

माझ्यामते योगेशसाहेबांना हेच अपेक्षित आहे.

योगेशसाहेबांनी दुसऱ्या एका चर्चेदरम्यान "काही दिवस (तरी) मांसाहार करू नये" याचे समर्थन करताना....

निदान प्राण्यांची हत्या आपण थांबवू शकत नसलो तरी कमी नक्कीच करू शकतो ह्या ठाम मताचा मी आहे . मी जितका खाद्यप्रेमी आहे ,तितकाच प्राणिमित्र सुद्धा आहे ,हे सुद्धा तितकच खर ...
माणसांप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे हे ही मला माहीत आहे . त्यांच स्वातंत्र्य मला प्रिय आहे.

असे म्हटले आहे. म्हणजेच प्राण्यांच्या हत्या करणे योग्य नाही असे कुठेतरी त्यांना वाटत असावे. असो.

वर एका प्रतिसादात ही यादी दिली होती. (त्याशिवायही शाकाहारी झालेल्या मूळच्या मांसाहारी लोकांची यादी देता येईल. उदा. ही यादी) त्या यादीतील बहुसंख्य लोक (गांधी वगळता) अभारतीय आहेत आणि केवळ "प्राण्यांची हत्या करणे न आवडल्याने/न पटल्याने" शाकाहारी झाले आहेत. अभारतीय लोकांचा संदर्भ अश्यासाठी की ते लोक (सामान्यतः) स्वतःला पटल्याखेरीज आपली मते बदलत नाहीत (अशी बऱ्याच लोकांची मान्यता आहे आणि काही अंशी खरीही आहे). शिवाय त्यांच्या धर्मातही मांसाहार करू नये असे म्हटलेले नाही.

त्यामुळे "प्राणी मारले जाऊ नयेत" हे शाकाहारी लोकांचे, शाकाहारी असण्यामागचे/होण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.