शीर्षकावरून दचकलात ना?

अहो हे नाव आहे एका ढाब्याचं. मुंब्रा-पनवेल मार्गावर एक शीळफाटा नावाचे गाव येते. येथून कल्याण आणि वाशी, नवी मुंबईकडे रस्ते जातात. या ढाब्यामध्ये तुम्हाला कोंबडी निवडता येते. तुम्ही सांगाल ती कोंबडी ताजी शिजवून प्रस्तुत केली जाते. येथे तंदुरी चिकन आणि रोटी असा बेत मस्त जमतो. एक कोंबडी जवळजवळ चार जण फस्त करू शकतात.

--ध्रुव.