अंधेरी द्रुतगतीमार्गावर पुलाच्या खाली एक ढाबा/कॅबीन आहे (नांव लक्षात नाही), स्टेशनकडून येताना व पुढे कुर्ल्याला जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या खालचा जो वाहतूक नियंत्रक आहे त्याच्या कोपऱ्यावर डाव्या हाताला......
सर्व प्रकारचे तंदूर पदार्थ मस्त मिळतात. खास करून टिक्के एकदम झकास ! द्रुतगती मार्गावर पुलावर न चढता गाडी बाजूच्या रस्त्याने आणल्यास साई सर्व्हिस चे शोरूम लागेल ते व येणारा वाहतूक नियंत्रक पार करून गाडी डावीकडे थांबवायची. 
पटकन जाऊन ऑर्डर दिली की १० मिनिटांत गरम गरम टिक्के हजर ! मग हळू हळू गाडी चालवताना, टिक्क्यांचा चटणी बरोबर आस्वाद घ्यायचा.... घरी पोहचे पर्यंत छानसे अडम तडम खाणे संपलेले असते.... पिझ्झा बर्गर पेक्षा हेच मधल्या वेळेचे खाणे बरे.... सायंकाळी ७ नंतर गर्दी वाढते म्हणून वेळ लागतो. किंमतीही मर्यादित आहेत.