रोहिणी व विनायक, नमस्कार.

मला जाणीव आहे की मुळात आपल्या सगळ्यांनाच कुठल्याही आधुनिक तांत्रिक विषयांवर मराठीत वाचण्याची सवय नसल्याने हे अवघडच जाणार आहे. पण अलीकडेच वरदा, मीरा फाटक इत्यादी मान्यवरांच्या लिखाणांमुळे मनोगतींना तांत्रिक लिखाण मराठीतून वाचनाची सवय होत असल्याने स्थिती जरा बरी आहे. अशात, तुमच्यासारखे रुची घेऊन वाचणारे आणि जाणीवपूर्वक अभिप्राय देणारे लोकच लिहिण्याचा हुरूप वाढवू शकतात. तुमच्या अभिप्रायांखातर मनःपूर्वक धन्यवाद.