वा वा ! झकास चर्चा चाललीये !

पुण्यात दुर्दैवानी ताजे समुद्रीमासे मिळत नाहीत. त्यामुळे कोंबडी आणि बोकड हेच आमचे आवडते प्राणी.

तसं तंदूर स्पेशल फ़ातिमानगर मधलं "दॅट्स इट" पण झकास आहे. डेक्कन वर "लकी" समोरचं "गुडलक" पण बेष्ट ! तिकडे गेलं की मेन्यू न बघता "चिकन मसाला विथ लेगपीस" ऑर्डर करावी ! डेक्कन वरचं "खैबर" पण झकास आहे ! (त्याबाहेरचा पानवाला पण पुण्यात जगप्रसिद्ध आहे !).

एम जी रोड वरचं "जॉर्ज" मटण बिर्याणी साठी उत्तम.