उपलब्धी (मराठी) म्हणजे ऍवॅलेबिलिटी ना? हिंदीत तो अचिव्हमेंट साठी वापरत असतील तरी मराठीत तो योग्य ठरेल असे मला वाटत नाही.
नरेंद्र गोळेंनी सुचविलेला सिद्धी हा शब्द जवळचा आहे. तरी सिद्धी शब्दामध्ये गोष्टी तुमच्या प्रयत्नाने घडवून आणण्यापेक्षा तशाच (योगायोगाने, दैवामुळे वा इतर कुणाच्या प्रभावामुळे) घडल्याची छटा (मला) जाणवते (कदाचित ती तशी नसेलही), म्हणून मी मिळकत हा शब्द वापरला.