प्रवासी महोदय धन्यवाद. आपल्या विस्तृत प्रतिसादाने बरे वाटले.
मापनातीत म्हणजे मापन अशक्य असलेला. मात्र अपेक्षित अर्थ सद्य मापन-उपकरणांद्वारे मोजता येत नसलेला असा आहे.
कंटिन्युअस साठी वरदा ह्यांनी सुच़वलेले सलग व अखंड हे शब्द योग्य वाटतात. कबूल आहे.
कन्व्हेन्शनल = पारंपारिक
पारंपरिक असा शब्द आहे असे वाटते. बरोबर आहे.
इझी टू कंस्ट्रक्ट = रचनासहज
सुरच्य, सुरचनीय. खरय. पण मला याहून निराळा असा रचनासुलभ हा एक नवाच शब्द आता बरोबर वाटत आहे.
ऋणाणू, धनाणू, विरक्ताणू हे शब्द आवडले पण अणू च्या ऐवजी त्यांना अणुक म्हणणे जास्त च़ांगले वाटते. धनाणूला धणाणू म्हणण्यात माझी झालेली चूक मला मान्य आहे. तुम्ही सुचविता तसे अणुक म्हणण्याऐवजी मला ऋणाणुज, धनाणुज व विरक्ताणुज असे नवे शब्द सुचवावेसे वाटतात कारण ते अणूअंतर्गत असल्याचे त्यातून व्यक्त होते. तुम्हाला काय वाटते?
फास्ट = दृत
द्रुत (द् + रु) खरे तर ह्या दोन्हीतला फरक मला अजूनही समजत नाही. जरा नीट प्रबोधन करावे ही नम्र विनंती.
ह्यूज = अजस्त्र
अजस्र (स् + र) कबूल आहे.
पोर्टेबल = जंगम, सुटसुटीत
वहनीय कबूल आहे.
रिऍलिटी = तथ्य
वास्तव योग्य वाटते. कबूल आहे.
सिम्बॉल = चिन्ह
चिह्न (ह् + न) अर्थात ह्यावर एक वेगळा वाद च़ालू आहे. खरे तर ह्या दोन्हीतला फरक मला अजूनही समजत नाही. जरा नीट प्रबोधन करावे ही नम्र विनंती.