वृकोदर साहेब,
मी काय खावे आणि काय खाऊ नये, असे कुठेही म्हटलेले नाहीये.
आहाराबाबत , मांसाहार आणि शाकाहार यांची तुलना अयोग्य आहे, असे माझे म्हणणे आहे.
दोन्हींचे वेगवेगळे फायदे तोटे आहेत.
परंतू, वनस्पतीमधी "जीव" असतो, म्हणून, कोवळी कोंबडी कापून खाणे आणि मोड आलेले कडधान्य खाणे एकच, असा दावा, शास्त्रीयदृष्ट्या चूक आहे.
नवजात अर्भक किंवा भ्रुण आणि मोड आलेली कडध्यान्ये यांच्यात फारच फरक आहे. जसे, नवजात अर्भकाला आणि भ्रुणाला थोडी का होईना, आकलन शक्ती असते, मोड आलेल्या कडधान्याला नसते. ( अर्थात, आकलन शक्ती, हाही वादाचा मुद्दा असू शकतो, हे मला तुमच्याकडे पाहून वाटते, पण ते असो ! )
जे खायचे ते खा.. माझा काहीच आग्रह नाही. परंतू, आपल्या आहाराचे समर्थन करताना, चुकीची तुलना टाळा, असे माझे म्हणणे आहे.
मांसाहार आणि शाकाहार, कोणत्या पातळीवर एक ठरतात, याचे मला शास्त्रीय पुरावा द्या, मी मान्य करतो. उगाच, असे वाचल्याचे आठवते आणि तसे वाचल्याचे आठवते, असे नको. पुराव्यानिशी सिद्ध करा !