कदाचित म्हणून हिंदू संस्कृतीत शाकाहाराला जास्त महत्त्व आले असेल.

शाकाहाराचे तुम्ही सांगितलेले फायदे बरोबर आहेत. पण "त्यामुळे" हिंदू धर्मात शाकाहाराला महत्त्व आले, असे म्हणणे म्हणजे, अर्ध्या माहितीवरुन अनुमानास येणे आहे.

१. आयुर्वेदाने शाकाहाराला मान्यता दिलली आहे. आयुर्वेदाने मानवी शरिराचा संपूर्ण अभ्यास करून मगच शरिराला योग्य असा ( शाकाहार ) आहार सुचवला.

२. योगसाधना करणारे लोकही मांसाहार टाळतात, कारण मांसाहाराने शरीरात अकारण मेद व चरबीची वाढ होते.

३. हिंदू जीवन संस्कृती ज्या भागात रुजली आणि वाढली, तो भाग उष्ण कटिबंधीय आहे. तिथे सात्विक आहाराचे महत्त्व जास्त आहे, कारण उष्ण वातावरणात शरिरात जर अनावश्यक उष्णता निर्माण झाली तर संपूर्ण शरिरावर त्याचा दुष्परिणाम होतो. ( तुम्हाला किमान हे मान्य असेल की, भौगोलिक संरचनेप्रमाणे, त्या त्या भागात रहाणाऱ्या लोकांचा आहार असतो ! )

पुन्हा एकदा...

जे खायचे ते खा. उगाच तुलना करण्याच्या नादात गैरसमज पसरवू नका !