हे मात्र अगदी बरोबर आहे !
प्राणीहत्या केवळ छंदासाठीही केली जाते याचे नवल वाटते. शिवाय, प्राण्यांच्या अवयवांचा धंदा करणारेही असतात.
आता, वृकोदर महोदय, तुमच्याच लॉजिकप्रमाणे,
चंदनाची झाडे तोडून विकले काय,झाडावरचे आंबे तोडून विकले काय, देवपुजेसाठी फुले वापरली काय
आणि
हत्ती मारून हत्तीचे दात विकले काय, वाघाचे कातडे विकले काय, किंवा हरणाचे कातडे विकले काय...
दोन्हीं प्रकारच्या व्यवहारांना तुम्ही एकाच तागडीत तोलाल काय ? तसे असेल तर कोकणातल्या तमाम जनतेस, सजीव-हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली पाहिजे ! आणि प्रत्येक देवपूजा करणाऱ्यास अटक केली पाहिजे.
किंवा चंदनचोर वीरप्पनला उगाच छळले म्हणून त्याचे परिमार्जन केले पाहिजे, वाघ/हरीण यांची हत्या करणे सामान्य कृत्य समजले पाहिजे.
पटते का ?