पंधरा दिवसांपूर्वी माझ्या घड्याळाची सेल संपली. अर्थात घड्याळ बंद पडले.अस्मादिकांच्या अत्यंत आळशी स्वभावामुळे (जिज्ञासूंनी माझ्या  सौ.कडून या माझ्या गुणाची स्तुती ऐकावी. या विषयावर बोलताना तिच्या जिभेवर सरस्वती वास करते.) अजूनही नवी सेल आणली नाही. त्यामुळे मी १५ दिवस वेळ बघण्यासाठी मोबाईल ( बाईल नव्हे !) बघत असतो . स्वानुभवाने सांगतो की हे फार कंटाळवाणं काम आहे. वैताग आला आहे नुसता- सतत खिश्यातून मोबाईल काढा, वेळ बघा, परत ठेवा याचा. मनगटी घड्याळ कधीही बरं! (मात्र तरीही सेल आणण्यास मुहुर्त सापडला नाही हे अलाहिदा. आमच्या हिला वेळच्या वेळी कामं करायला नको‍! झापलं पाहिजे.)
मिलिंद