आदरणीय नरेंद्रपंत,

शब्दांची वस्तुनिष्ठ चर्चा पुढे चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद.

मापनातीत म्हणजे मापन अशक्य असलेला. मात्र अपेक्षित अर्थ सद्य मापन-उपकरणांद्वारे मोजता येत नसलेला असा आहे.

अतीत म्हणजे पलीकडे गेलेला. कालातीत, देहातीत इत्यादी. त्यामुळे मापनाच्या पलीकडे गेलेला तो मापनातीत अशी आमची सुच़वण आहे.

इझी टू कंस्ट्रक्ट = सुरच्य, सुरचनीय. खरय. पण मला याहून निराळा असा रचनासुलभ हा एक नवाच शब्द आता बरोबर वाटत आहे.

वा! हा शब्द आवडला.

तुम्ही सुचविता तसे अणुक म्हणण्याऐवजी मला ऋणाणुज, धनाणुज व विरक्ताणुज असे नवे शब्द सुचवावेसे वाटतात कारण ते अणूअंतर्गत असल्याचे त्यातून व्यक्त होते. तुम्हाला काय वाटते?

ज म्हणजे जन्मलेला असे वाटते. उदा० पंकज, अंबुज, द्विज इत्यादी. त्यामुळे अणुज म्हटले तर अणूतून जन्मलेला असा अर्थ ध्वनित होतो. 'क' हा छोटेपण दाखवणारा तद्धित प्रत्यय आहे. ऋणाणुक, धनाणुक, तटस्थाणुक. शब्द आणखी छोटे करायचे असतील तर सरळ ऋणक, धनक, तटस्थक असेही म्हणता येईल कदाचित.   

फास्ट = दृत द्रुत (द् + रु) खरे तर ह्या दोन्हीतला फरक मला अजूनही समजत नाही.

द् + ऋ = दृ (अक्षर)
द् + रु = द्रु (ज़ोडाक्षर)
द्रुत हा शब्द आहे असे वाटते.

सिम्बॉल = चिन्ह चिह्न (ह् + न) अर्थात ह्यावर एक वेगळा वाद च़ालू आहे. खरे तर ह्या दोन्हीतला फरक मला अजूनही समजत नाही.

ह् ला न असा मूळ शब्द आहे. आधी ह् चा उच्चार व नंतर न चा उच्चार.

आपला
(शब्दप्रेमी) प्रवासी