तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
मनगटी घड्याळ जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा लोकांना त्याची सवय करून घेणे जड गेले होते असे ऐकून आहे, पण हळूहळू त्यांना त्याच्या उपयोगाचं महत्त्व पटत गेल्याने त्यांनी जाणूनबुजून घड्याळ वापरण्याची सवय अंगिकारली.
कोणाला चूक/बरोबर ठरवणे अभिप्रेत नाही किंवा व्यक्तिगत आवडीनिवडीचा भाग नाही असेही माझे म्हणणे नाही. नविन अधिक सोयींनी सज्ज गोष्टींची सार्थ उपयुक्त्तता केवळ जुन्या गोष्टीवरच्या प्रेमाखातर अथवा तिच्या झालेल्या सवयीखातर कोणी अवलंबत नसेल, तर तसे करण्यामागील त्यांची याव्यतिरिक्त काही कारणे असतील तर ती जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
मनगटी बांधू शकू असेही भ्रमणध्वनी बाजारात आहेतच शिवाय भ्रमणध्वनिकडे बघताच एका दृष्टीक्षेपात वेळ ( दिनांक/वार सकट ) कळेल अशी सोयही बहुतेक सर्व भ्रमणध्वनींमध्ये आहे.
'नजर के सामने, जिगर के पास, कोई रहता है, वो है मोबाईल !' असं असताना वेळेसाठी घड्याळ वापरण्याची मलातरी जरूर वाटत नाही !