ज्ञानेश्वरांनी तर द्रुष्टांताचा सडा पाडला आहे. मला दहावी ला एक अजोड द्रुष्टांताची कविता होती. मूळ श्लोक गीतेतला आहे "यत्र योगेश्वरो क्रुष्ण : यत्र पार्थो धनुर्धर:। तत्र श्रीर्विजयो ध्रुतिर्मतिर्मम।" आणि हा श्लोक तुम्हां आम्हांला समजवण्यासाठी त्यांनी पुढील ओव्या लिहिल्या: चंद्रु तेथ चंद्रिका शंभू तेथ अंबिका। संत तेथे विवेका असणे की जें॥ कोणाला पूर्ण आठवताहेत का ह्या ओळी? दहावी नंतर मराठी व्याकरणाचा तसा राडाच झाला.. कारण पुढे मार्कांच्या हावेने १०० संस्क्रुत घेतले. अर्थात तेही फार आठवते आहे असे नाही.