प्रवासी महोदय,

विषय चांगला निवडला आहे.

आजकाल काही मराठी चित्रपट बघितले तर निश्चितच खात्री पटते की त्यांची गुणवत्ता वाढली आहे. वेगळ्या विषयांवरील चित्रपट येत आहेत.

उदा. देवराई, पक पक पकाक, बिनधास्त, रात्र-आरंभ, सातच्या आत घरात इ.

पण काही ठराविक प्रेक्षकवर्गच या चित्रपटांना मिळालेला आहे असे वाटते. त्यामुळे संख्या एकूण वाढली आहे की नाही याबद्द्ल मला साशंकता वाटते.

मी स्वतः वर उल्लेखलेले सगळे चित्रपट पाहिलेले आहेत (चित्रपटगृहात) आणि पुढेही बघीन.

पण सध्या इथे (इंग्लंडमध्ये मी राहते त्या शहरात) तरी मराठी भाषिकांसाठी काही संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे चांगल्या मराठी चित्रपटांना मुकल्यासारखे वाटते.

अंजू