प्रवासी,

गेल्या कित्येक वर्षात मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघितला नाही. जे काही बघितले ते परत चित्रपटगृहात जाऊन बघायला नक्कीच आवडतील. (अष्टविनायक, उंबरठा, एक डाव भुताचा)

२००५ मधे डीशवर काही मराठी चित्रपट झी सिनेमा या हिंदी चित्रपटवाहिनीवर बघायला मिळाले. एक 'सवत माझी लाडकी' आणि एक, त्याचे नाव आठवत नाही. त्यामधे निशिगंधा वाड, प्रशांत दामले आणि अशोक सराफ होते.

सातच्या आत घरात, श्वास हे चित्रपट पहावेसे वाटतात, पण कधी पहायला मिळतील काय माहित? चित्रपटामधे पुर्वी मॅटीनी (दुपारचा १२ ते ३) दाखवायचे, अजुनही मॅटीनी पहायला मिळतो का? दुसरे म्हणजे असे की जुने चित्रपट (हिंदी/मराठी) चित्रपटगृहामधे गेल्या कित्येक वर्षात कधीच लागलेले पाहिले नाहीत, असे का होत असावे?

रोहिणी