प्रवासी महाशय,

सुंदर विषयावर चर्चा मांडली आहे.मला अस वाटतं की हल्ली प्रसारीत झालेले नवीन चित्रपट एका चाकोरितले नाहीत..वेगवेगळ्या विषयांवर आहेत.कदचित त्यातच त्यांच्या यशाचे रहस्य आहे.वर उल्लेखलेले बहुतेक चित्रपट श्वास, सातच्या आत घरात, तू तिथे मी, बनगरवाडी इ. मी पुण्यात असताना चित्रपटगृहात जाऊन बघितले आहेत.पण आता पुणे आणि भारत सोडून अमेरिकेत आल्यावर मात्र त्या आनंदाला मुकावे लागत आहे.ध्वनीमुद्रीत तबकड्यांचा(सी.ड़ी.) थोडासा आधार आहे.श्वास प्रेमींसाठी खूषखबर..२६/२७ डिसेंबरला झी सिनेमा वर श्वास प्रसारीत करणार आहेत.त्यामुळे परदेशस्थांना त्याचा आनंद घेता येइल.

सोनिया