प्रवासी,

    अतिशय छान विषय निवडला आहात. आजकाल छान छान मराठी चित्रपट येत आहेत असे ऐकून आहे. यातील काही पाहिलेही आहेत. परदेशात मराठी चित्रपट पाहण्यास पर्याय म्हणजे एकतर भारतातून चकत्या मागवून घेणे अथवा येथून ते उतरवून घेणे. पध्दत थोडी क्लिष्ट आहे. शिवाय माहितीजालाचा वेगही अधिक हवा.

    अगंबाई अरेच्चा आणि नवरा माझा नवसाचा हे विनोदी चित्रपट असावेत. पण आजकाल मराठीतील चित्रपटांमध्ये गंभीर विषयही हाताळले जात आहेत याचे उदाहरण म्हणजे देवराई आणि सातच्या आत घरात सारखे चित्रपट. लहान मुलांसाठी गोड गुपित, पक पक पकाक हे चित्रपट ही छान आहेत. तसेच सावरखेड एक गाव, बिनधास्त आणि आधारस्तंभ यासारखे राजकीय आणि रहस्यमय चित्रपट ही पाहावयास मिळाले. श्वास मधील अरूण नलावडे आणि बालकलाकाराचे काम वगळता काही खास वाटले नाही.
 
  पूर्वी मराठी चित्रपटात ठरलेले वर्तुळ असायचे ते आता फारसे दिसत नाही. जमीनदार,पाटीलकी,तमाशा वगैरे नाहीसे झाल्याचे आढळते. नाविन्याची ओढ आणि वास्तवाचा मेळ चांगला आहे. प्रेक्षकसंख्या शहरी भागात वाढत असावी. चित्रपटगृहांची उपलब्धततेमुळे असेल कदाचित. खेड्यांमध्ये मात्र हिंदी चित्रपटांच्या चकत्या अधिक पाहिल्या जात असाव्यात. दूरदर्शन(सह्याद्री वाहिनी) वर तर तेच तेच मराठी सिनेमे पुन्हा पुन्हा दाखवले जातात. असे निरीक्षण आहे.

श्रावणी