ऋणाणूज वगैरे शब्दांपेक्षा प्रवासी महोदयांनी सुचविलेले ऋणक, धनक, तटस्थक हे शब्द आवडले. ऋणाणुज म्हणजे अणु पासून जन्मलेला ऋण कण असा अर्थ होत असल्याने ज युक्त शब्द योग्य वाटत नाहीत. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स पासून अणू बनतो, अणूपासून ते नाहीत. अणूंची मूलद्रव्ये बनतात.
रचनासुलभ हा शब्द छानच.
मापनातीत मधून 'सद्य मापकांचा वापर करून मोजण्यास अशक्य' असाच अर्थ निघेल ह्याची शंका वाटते. मापनातीत मधून 'ज्याचे मापन (कधीच) होऊ शकत नाही (आणि शकणारही नाही) असे' असा अर्थ निघतो, मात्र 'ज्याचे मापन (सध्या) शक्य नाही असे' असा अर्थ अपेक्षित आहे असे वाटते. आपल्याला काय वाटते?