प्रवासी महोदय, प्रतिसादाखातर धन्यवाद.

इलेक्ट्रॉन = ऋणक, वीजक

प्रोटॉन = धनक

न्युट्रॉन = विरक्तक (तटस्थ शब्दाचे अनेक प्रचलित अर्थ त्याच्या उपयोगात संदिग्धता निर्माण करतात.)

इझी टू कन्स्ट्रक्ट = रचनासुलभ

मापनातीत = मापनसीमापार (वरदा म्हणतात ते बरोबर आहे. म्हणून दुसरा योग्य पर्याय मिळेस्तोवर हाच ठेऊ या.)

हे शब्द स्वीकारावेत असे मला वाटते.

वरदा, चर्चेत सकारात्मक सहभाग घेतल्याखातर धन्यवाद.

प्रशासक महोदय, या निमिताने एक अशी सूचना करावीशी वाटते की अशा विस्तृत चर्चांमधून स्वीकारल्या गेलेल्या तांत्रिक पारिभाषिक मराठी शब्दांचा कायमस्वरुपी शब्दसंग्रह मनोगतावर ठेवता आल्यास व त्यात अहर्निश भर घालत राहिल्यास आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान विषयातला सशक्त शब्दकोष आपण मराठीला देऊ शकू. मात्र त्याचे स्वरूप एका स्तंभात मूळ इंग्रजी शब्द रोमनमध्ये व दुसऱ्या स्तंभात मराठीतील पर्यायी, प्रतिशब्द देवनागरीत अशी सोय असावी. मला खात्री आहे की ते एक संदर्भ साधन बनून राहील. पुढे त्याला अनुक्रमांक, अल्फाबेटीकल तसेच अकारविल्हे संदर्भन यांचीही सोय करता येईल.