आजकाल खरोखरच वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट येत आहेत . गेल्यावर्षी चित्रपटगृहात जाऊन पाहीलेले चित्रपट असे ..

१. ‌सावरखेड एक गाव -- तरूणाईचा एक ग़ूढ चित्रपट

२. गोडगूपित -- रिमा लागू आणि दिलीप प्रभावळकर ह्यांच्या सहजसुंदर अभिनय , चित्रपटाच्या शेवटी विशेष जाणवतो !!

३.पकपकपकाक -- सक्षमचा अभिनय आवडला !!

४. ‌श्वास -- काही सांगणे नलगे ...

५. अगबाई अरेच्चा -- ह्यातले " मन ऊधाण वा-याचे " हे  गाण विशेष आवडून गेलय ...कडवी तर अहाहा ..अप्रतिम आहेत .. हे गाण इथून Download(प्रतिशब्द सुचवावा ) करा .  http://as01.cooltoad.com/music/song.php?id=160571

आणि आत्ता डोंबिवली फास्ट बघायचा आहे !!!