कृष्णशास्त्री चिपळूणकरांची ही एक मला सर्वात आवडणारी अन्योक्ती:
मेघांच्या गर्जनेने खवळुनि वरती सिंह पाही स्वभावे ।
काका, त्वां भीति सारी त्यजुनि तरुवरी मांसखंडासि खावे ॥
जो उन्मत्तां गजांच्या खरतरनखरी फोडुनी मस्तकाते ।
आला रक्ता पिऊनी नच मृत पशुच्या इच्छितो ते कणाते ॥
ही एखाद्या मूळ संस्कृत अन्योक्तीचे भाषांतर आहे की शास्त्रीबुवांची स्वतःची निर्मिती आहे, माहित नाही पण जे आहे ते जबरदस्त आहे. शेवटच्या ओळीतल्या 'आला' शब्दाचे विस्मरण झाले आहे असे वाटते. कुणास नक्की माहित असेल तर सांगावे.