प्रवासी महोदय,
छान विषय निवडलात चर्चेला !
मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारतो आहे हे नक्की... मित्रमंडळींच्या घोळक्यांत हल्ली मराठी चित्रपटांच्या विषयालाही जागा मिळालेली आहे हे त्याचेच द्योतक आहे.
मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर (पटावर) नावाजला की मराठी मंडळी झोपेतून जागी होतात. मग त्या चित्रपटाच्या चर्चा सुरू होतात हा आजवरचा अनुभव आहे.
मी स्वतः बऱ्याचं दिवसांत मराठी किंवा हिंदी चित्रपट - (चित्रगृहात) बघितल्याचे आठवत नाही. शेवटचा हिंदी लगान होता ! घरबसल्या बरेच चित्रपट बघता येत असल्याने व नको तो भाग वगळता येत असल्याने चित्रपटगृहात चित्रपट बघायला जायचा कंटाळा येतो.
त्यातच आजकाल चकत्यांची पायरसी (मराठी शब्द शोधा) वाढल्याने १००/१५० रुपयांत पाच चित्रपटांची डीव्हीडी मिळते.
वेळेचा भाग महत्त्वाचा असल्यानेही हातात वेळ असेल तेंव्हा जवळपास चांगला मराठी चित्रपट लागलेला नसतो. तर जेंव्हा चांगला चित्रपट लागतो तेंव्हा काही ना काही कामे मागे लागलेली असतात.  
एक नक्की.... आता चित्रपटगृहांत जाऊन खेळ बघणारी मंडळी कमी झाली आहेत त्या अनुषंगानेच निर्मात्यांनीही आता नवीन सिनेमांच्या चकत्या माफक किमतीत लवकर उपलब्ध करून दिल्यास मराठी सिनेमाच्या हिताचे ठरेल !
******
श्वास बद्दल न लिहिता इतर चित्रपटांबद्दल लिहितो,
न कंटाळता पूर्ण पाहिलेले बरेचसे चित्रपट आहेत पटकन आठवतात ते -
चौकट राजा - दिलीप प्रभावळकर.  - उंबरठा - स्मिता पाटील,
एक डाव भुताचा - अशोक सराफ व दिलीप प्रभावळकर -
सिंहासन- अनेक कलावंत (मुख्य निळू फुले व अरूण सरनाईक )  
अशीही बनवा बनवी, नवरी मिळे नवऱ्याला - सचिन
काही जुने आवडलेले-
शामची आई, घरकुल, अशीच एक रात्र होती, सामना, पिंजरा, मुंबईचा जावई....
हे सर्व संग्रहात ठेवण्या लायक आहेत.
चर्चे सोबत ह्याच सदरात आपल्याला आठवतील तितक्या चांगल्या मराठी चित्रपटांची नांवेही लिहूया - आठवली की प्रतिसादात देतच राहीन !