अनु, एवढा तात्काळ प्रतिसाद मिळाला की वाटले तुम्हाला मी लिहिण्याआधीच माहित होते की काय?
प्रवासी, सुवर्णमयी तुमच्या हौसलाअफजाईखातर आभारी आहे.
शशांक, दुव्याखातर धन्यवाद. मीही ऐकेन तिथे जाऊन.
श्रावणी, म्हणून पाहिलत की काय?
रोहिणी, चक्रपाणी आणि विनायक हार्दिक धन्यवाद.
मैथिली, मला तुमचे कौतुक वाटते. मीही अनुवाद लिहायला अशीच अचानक सुरूवात झाली होती. मला वाटले की रेणू दांडेकर त्यावेळी करीत असलेल्या अटल बिहारींच्या कवितांच्या अनुवादांपेक्षा मीच चांगला करू शकेन. आणि नंतर मी अटल बिहारींच्या नऊ सुंदर कवितांचा अनुवाद केला. ते मायबोली डॉट कॉम वर उपलब्ध आहेत.
मात्र मी घरी गेल्यावर जेव्हा पुन्हा अनुवाद वाचला तेव्हा मला खालील सुधारणा सुचल्याः
१. ध्रुवपदातील शेवटला चरणा 'वाटून ओझे घ्या हो' असा हवा.
२. पहिल्या कडव्यातील पहिले दोन चरण असे हवेतः
'जेव्हा एकजुटीने आम्ही, कष्ट उपसले सारे, समुद्र झाला देता रस्ता नतमस्तक नग झाले'
३. शेवटल्या कडव्यातील पहिला चरण असा हवाः
'मूमीतूनही हिरे काढतो, पाण्यातूनही मोती'
आशा आहे की तपासून पाहण्याआधीच प्रसृत केल्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल.