कविता बरी आहे, पण शेवट अगदीच फिल्मी पध्दतीने केला आहे. प्रियकराला मारायचाय? मग पाठवा युध्दावर!! सैन्य, युध्द, तिकडचे वातावरण या सारखे फार गंभीर विषय कविता, कथा, कादंबऱ्यांकरता फार सहजपणे अगदी सोयिस्कर रितीने घेतले जातात! कारगीलसारख्या अत्यंत अवघड ठिकाणी थंडीच्या दिवसात एकदा या सर्व कवी, कथाकारांना धाडले पाहिजे. लिहिणं तर सोडाच, बोलतीच बंद होईल.

कवितेतून नायक-नायिकेचे भावपूर्ण संबंध चांगले प्रस्थापित केले आहेत, पण नायकाला मारायला युध्दच का आठवले बरे? त्याचे मरण ट्रकखाली सापडून झाले आहे असे का नाही दाखवले बरे? की त्यामुळे त्याच्या 'नायकपणाला' बाधा येईल?

(मरण हे कुठलेही वाईटच. ट्रकचे फक्त उदाहरण दिले आहे. पण नायकांना मारायला सैन्य, युध्द, वगैरेसारख्या जागा फार सोयिस्करपणे घेतल्या जातात याला आमचा आक्षेप आहे.)

राजीव अनंत भिडे.