मला वाटतं हा वाद निष्फ़ळ आहे.

निसर्गनियमांनुसार, मनुष्य हा निर्विवाद्पणे शाकाहारी आहे.
पण, कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी कोणावर आपलं म्हणणं लादू नये.

जेव्हा मला, काही करावे का करुं नये असा प्रश्न पडतो, तेव्हा माझा एकच निकष असतो. "जे करायचं त्याची लाज वाटत असेल तर ते करुं नये. आणी जर करायचे असेल तर त्याची लाज बाळगू नये."

योगेश आणी त्याच्यासारख्या इतर व्यक्तींना माझं एक सांगणं आहे.
तुम्हाला मांसाहार आवडत असेल तर न लाजता करा. इतरांची गैरसोय न करता कधीही आणी कुठेही खाल्ले तरी चालेल.

आजवर जगात सर्वत्र धर्माचा प्रभाव होता त्यामुळे बहुतेक नीती-नियम आणी इतर संकल्पना ह्या आत्तापर्यंत धर्माशी निगडीत होत्या. धर्म श्रद्धा मागतो, कारणं देत नाही. स्थळ-काळानुसार नीती-नियम, संकल्पना बदलत असतात. त्यामुळे त्यांची तुलना शक्यतो टाळावी.

प्राणीहत्या आणी वृक्षतोड यात मी तरी फ़रक करत नाही. दोन्ही सजीवच आहेत. फ़ार तर, प्राणी आपल्यातले असं मी मान्य करेन. (त्यांना डोळे असतात, आपल्याला पण असतात. त्यांना भावना असतात... वगैरे....)

शाकाहारी की मांसाहारी किंवा दोन्हींपैकी काय योग्य, असले वाद फ़ालतू आहेत. प्रत्येकानं आपलं मत आपआपल्या संकल्पनांशी पडताळून पहावं. पटलं तर खावं. नाहीतर सोडून द्यावं.

योगेश, मला वाटतं हे उत्तर प्रत्येकाच्या सद्सदविवेकबुद्धीला पटणारं असावं! आणी हो, मी शाकाहारीही आहे! त्यामुळे तुझ्या प्रश्नाला अपेक्षित उत्तर मिळालं असावं अशी आशा करतो....



अर्थात, इतरांनाही त्यांचं म्हणणं मांडण्यास अजिबात हरकत नाही.