निरंजन ,माझा मुद्दा मांसाहार योग्य आहे का नाही ,किंवा तो करणे कितपत योग्य आहे हा नाहीच आहे ... इथे ब-याच जणांचा तो गैरसमज झालेला दिसतोय ,किंवा कदाचित मी तो योग्य त-हेने मांडायला कमी पडलो असेन .... असो ...
माझा मुद्दा असा आहे की ,
शाकाहारी (सगळे नव्हे )लोक जे ,"आपल्या खाण्यासाठी कुणाचा जीव घेण पटत नाही " म्हणून मांसाहार करत नाही ,असे लोक झाडांनासुद्धा,वनस्पतिंनासुद्धा जीव असतो ही गोष्ट का लक्षात घेत नाहीत किंवा घेत असल्यास ते कुठ्ल्या बाबतीत ह्या दोन जिवांमध्ये फ़रक करतात ?? आपल्या खाण्यासाठी "अशा"लोकांना वनस्पतिंचा जीव घेणे सयुक्तिक वाटते . हा होता ...