पितळे महोदय,

तुमच्या एकंदरित लेखनावरुन, तुम्ही हा वाद खोडकरपणा करण्यासाठी उकरुन काढताय, असे माझे मत आहे.

लोकांनी तुम्हाला उत्तरे दिली, की तुम्ही त्या उत्तरांवर अतिशय विपरित अशी मल्लीनाथी करता आणि मुद्दा पुन्हा वेगळ्याच दिशेला भरकटवता.

आता पर्यंत हजार लोकांनी सांगितले की जे खायचे ते खावे, उगाच दुसर्यावर आहाराबाबत आपली मते लादू नयेत. पण हे मान्य करण्याऐवजी पुन्हा तुम्ही शाकाहार म्हणजेही जीवांची हत्या, हा मूर्ख मुद्दा उकरून काढत आहात. माझ्यासहित अनेक जणांनी या मुद्द्याचे खंडन केले आहे. त्याचे उत्तरे देणे तुम्हाला आवश्यक वाटत नाही काय ?

पुन्हा पुन्हा तेच ते रेटून तुम्ही काय साधता आहात, हे तुमच्याव्यतिरिक्त फक्त ईश्वर जाणे ! परंतू, तुमचा इथे खोडकर पणा चाललेला आहे, आणि हेतूशः तुम्ही शाकाहारी लोकांच्या भावना दुखावत आहात, असा माझा आरोप आहे. त्याबाबत कारणे दाखवा, अशी नोटेस तुम्हाला का बजावण्यात येऊ नये ?