अदिती,
तू म्हणतेस ते खरं आहेच. पुण्याचं टुमदारपण खरंच हरवलंय. पण हे तर कधी ना कधी होणारच होतं! सिमेंट ची जंगलं उभी रहाणारच होती. पण चंदेरी किनार ही की, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रांतील संधींमुळे आज पुणं अक्षरशः जगाच्या नकाशावर गेलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं होताना पुण्यानं आपला सांस्कृतिक, सामाजिक चेहरा जपलाय. आजही सवाई ला तितकीच तुडुंब गर्दी असते, आजही दिवाळीच्या पहाटे पुणेकर आवर्जून नववस्त्र परिधान करून तळ्यातल्या गणपतीच्या दर्शनाला जातो...आजही घरात कार्य निघालं की पहिलं आवताण कसब्याच्या गणपतीला अन तांबड्या जोगेश्वरीला जातं....
जो पर्यंत हे सगळं चालू आहे.... तो पर्यंत पुण्याचं "पुणेरीपण" हरवणार नाही. "टुमदार" पणाचं म्हणशील तर आमचं साताऱ्या अलिकडचं पाचवड सुद्धा "टुमदार" राहिलेलं नाही.
कालाय तस्मै नमः ! दुसरं काय ?