हे म्हणजे, नोकरी मिळत नाही, मिळवण्याची पात्रता नाही आणि पात्रता मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी नाही म्हणून मी चोरी/खून/दरोडे ईत्यादी गोष्टी करतो असे म्हणण्यासारखे आहे.
वैध तबकड्या जास्तीत जास्त २०० ते २५० रुपयांना मिळतात. २-३ महिन्यात एखादा चांगला चित्रपट, जो आवर्जुन पहावा, असा येतो ! मग २-३ महिन्यात २००-२५० रुपये खर्च करता येत नाहीत, ही लंगडी सबब आहे. प्रामाणिकपणाचे मूल्य दिवसेंदिवस घसरते आहे, आणि पैशाचे मूल्य अवाजवी वाढते आहे, हे चित्र दुर्दैवी आहे !
अवैधतेचे कोणत्याही कारणास्तव समर्थन करणे अत्यंत घातक आहे. स्वतः कलाकार असलेल्या व्यक्तीने ते करणे तर महाभयानक !
कुळकर्णींचे म्हणणे उपरोधिक असावे, त्यांच्या म्हणण्यात सत्यांश नसावा, अशी इच्छा आहे !