अदिती, तो, संयुक्ता आणि सुखदा,
तुम्ही जे मुद्दे मांडताय ते तंतोतंत खरे आणि अचूक आहेत यात वादच नाही. पण वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे ह्या गोष्टी अपरिहार्य ठरतात. त्यामुळे पर्वती आता पूर्वीसारखी दिसू शकेल ही अपेक्षा न ठेवलेलीच बरी.
आधीच्या पिढीसाठी पद्मावती हे दुसरं गाव होतं. पर्वती ला जाताना भिती वाटावी इतकी सामसूम असायची. पण तेव्हा पुण्याची लोकसंख्या आताच्या एक दशांश होती. "गेले ते दिन गेले" म्हणत टाहो फ़ोडण्यात काहीच अर्थ नाही.
त्यापेक्षा सुखदा चे मुद्दे पटतात. आपण प्रत्येकाने मग तो पुण्याचा असो, मुंबईचा असो अथवा नंदुरबारचा, आपल्या परिसराचा समतोल राखण्याचा प्रयत्न करायलाच हवा.