सुखदा, छान लिहिले आहेस. मला पण हेच म्हणायचे आहे. पुण्याचा विकास होतो आहे की त्याच्यावर सूज येते आहे हे वेळीच तपासून पहायला हवे. गुटगुटीतपणा आणि अनिर्बंधपणे वाढणारी कर्करोगाची गाठ यांच्यात गल्लत करू नये. ते जिवाला अतिशय घातक असतं.

नदीचा नाला केला की काय होऊशकतं ते नुकतंच मुंबईच्या मिठी नदीने जगाला दाखवून दिलं आहे. प्रलयातून अवघ्या अठ्ठावीस तासांत सावरलेल्या मुंबईकरांचं कौतुक करताना त्या प्रलयातला धोक्याचा इशारा वेळीच ओळखायला हवा. पुण्याचं पाणे अतिशय चवदार आहे कारण मुठेच्याउगमाजवळच्या क्षारांची ती देणगी आहे. हे पाणी औषधी आहे. त्या मुठेचं रक्षण कोणी करायचं? तिच्या पात्रात सर्कस आणि इतर मनोरंजनाच्या जत्रांचं मैदान तयार केलं जातं. त्याला विरोध कोणी करायचा? आणि त्याच नदीतल्या पाण्याची पातळी वाढली की घाबरून आपापल्या बहुराष्ट्रीय कंपनीमधून लौकर घरी पळायचं हे भ्याडाचं काम आहे. ओंकारेश्वराजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी लोटते कारण नदीला नदीसारखं पाणे वर्षातून काही दिवसच असतं. तिचं बाकीचं हक्काचं पाणी वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धरणात अडकवून ठेवायचं. आणि पुण्यातबाहेरून रहायला आलेले ओक आणि काही बेपर्वा पुणेकर ते अमृतासारखं पाणी आपल्या चारचाकी गाड्या धुवायला वापरतात.वाट्टेल तसं नासतात. फुकट मिळतंय म्हणून त्याची किंमत न समजून घेता उधळमाधळ करतात.
जंगली महाराज रस्त्याला पंचवीस वर्षात खड्डे पडले नाहीत. पण तो रस्ता बांधणाऱ्या माणसाचा असा रस्ता बांधल्याबद्दल खून झाला हे कशाचं द्योतक आहे? नदीपात्रातली वाळू बांधकामांसाठी अनिर्बंध उपसायची, नदीत वट्टेल त्या गोष्टी फेकून तिची कचरापेटी करायची. खडकवासला-पानशेत धरणाच्या पाण्यात दारू पिऊन धिंगाणा घालायचा. जाऊ तिथं खाऊ असं ब्रीद पुण्याचं कधीच नव्हतं. पुणेरी खाद्यसंस्कृती जगप्रसिद्ध आहे पण सध्या शनिवार-रविवार हॉटेलांबाहेर लागणाऱ्या रांगा पुण्यात १० वर्षांपूर्वी नव्हत्या हे मी छातीठोकपणे सांगू शकते.
क्वालिटी आणि क्वांटिटी चा झगडा याआधी इतका भेसूर झाला नव्हता.  देवस्वरूप कृष्णजन्माची आशा करावी आणि कंसासारखा दानव जन्माला यावा तसं झालंय हे सगळंअसं मला वाटतं. माझ्या कंपनीतले मद्रासी लोक स्वतः तर घाणेरडे राहतातच पण पुण्यात फुटाफुटावर दारू मिळत नाही, पुण्यात 'नाईट लाईफ' नाही , पुण्याचा अजून खूप विकासव्हायला हवा असं म्हणतात तेव्हा भितीने माझ्या छातीत धडधडायला लागतं. दिसली जागा की बांध इमारत, दिसलं झाड की तोड फांद्या, कर जागा मोकळी, दिसला डोंगर की कर भुईसपाट आणि फक्त इमारती बांध असा हव्यास करून आपल्याला काय मिळणार आहे? अजून पुण्याचं पुणेपण कुठेतरी शाबूत आहे.  जे. पी म्हणतो तसं अजूनही पुणेकर कुठेतरी पुणेकर आहेत. भांडारकर प्राचविद्य संस्थेवरच्या संकटात ते आपणहून एकत्र येतात. त्यांनाही त्यांच्या पुण्याचं पुणेपण तसंच रहावं असं वाटतं म्हणून हा लेखनाचा खटाटोप कारण आज पुणं जात्यात आहे उद्या बाकीची शहरंसुध्दा इथेच येणार आहेत. जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात असं होऊ नये म्हणून हा टाहो. हा टाहो अरण्यरुदन ठरू नये. पुण्याला पुणेपण प्रिय आहे त्याला ना पश्चिमेकडच्या ना पूर्वेकडच्या कुठल्याही शहरात परिवर्तित होण्याची आस वगरे नाही.

काळाचे इशारे वेळेवर ओळखून पावलं उचलली तर अजूनही परिस्थिती सावरू शकेल. नाहीतर खरंच कालाय तस्मै नमः असं म्हणावं लागेल.
संयुक्ता, तो, सुखदा, जेपी आपल्या पिढीची ही जबाबदारी आहे असं ला वाटतं की जमेल तितकी पडझड थांबवावी...

असो. सुखदाचा अभिप्राय वाचला आणि राहवलं नाही म्हहेणून  सगळं लिहून काढलं. खूप लांबलंय त्याबद्दल क्षमस्व.

अदिती

--अदिती