आपण केलेल्या सुधारणे बद्दल धन्यवाद. कदाचित घाई घाईत लिहिल्यामुळे चुकले असेल. आम्हांला दहावीला मराठी शिकवायला गो. म. किराणे नावाचे शिक्षक होते - सराव वर्गाला. त्यांनी मराठी भाषेची गोडी लावली. मला आठवते त्याप्रमाणे त्या ओवीचा अर्थ असा होतो - जिथे जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी पार्थ आहेत, तिथे तिथे यश आणि विजय हे निश्चितच आहेत अशी माझी धारणा आहे. आणि ह्या श्लोकाचे निरुपण करताना त्यांनी (किराणे सरांनी) एक अजून मजेशीर दृष्टांत दिला होता - लेंगा तिथे नाडी - कारण एकाशिवाय दुसरे असणे ह्याला अर्थ नाही, जसा कृष्णाशिवाय मिळालेल्या विजयाला अर्थ नाही!!