अदितीताई,

आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रत्येकाने विचार आणि कृती करावी असा.

सुखदाताई,

ह्या विषयावर आपण पोटतिडीकीने केलेले लेखन अत्यंत वाचनीय आहे.

एकनाथरावांनी उल्लेखिलेली चर्चा वातावरणाचे रक्षण व अमेरिकेची भूमिका येथे च़ालू आहे. आपण आपले मत ज़रूर मांडावे.

मागे मांडलेली काही वाक्ये पुन्हा लिहीत आहोत -
बदल अपरिहार्य असतो. निसर्गाशी समतोल राखत ज़ो बदल होतो ती संस्कृती. निसर्गाशी फारकत घेत ज़ो बदल होतो ती विकृती. विकास ह्या शब्दाची आपली व्याख्या वारंवार तपासून बघायला हवी असे वाटते.

आपला
(चिंतित) प्रवासी