पर्वतीपाशी ओवरब्रिज झाल्यापासून ती बदलली. आमच्या आजोळच्या गच्चीवरून कोणे एकेकाळी पर्वती दिसायची. पुढे नगरकर वाडा होता. तोही नेस्तनाबूत झाला.
आता जागोजागी बिनचेहऱ्याच्या निर्जीव कॉंक्रिट इमारती ठाकल्या आहेत. लाकडाचे काम असलेल्या चाळी आणि वाडे बघितले की जेवढे बरे वाटते तेवढेच वाईटही. यांचेही काही खरे नाही.
विश्रामबागवाड्यात आता स्नॅक्स सेंटर उघडले आहे. मिसळ आणि वडापाव खायला चला विश्रामबागवाड्यात. असो.
मग हळहळलो की कालाय तस्मै नम: हे जरी खरे असले तरी आपला वारसा नीट जतन करायला हवा, असा उदात्त विचार करायचा.
चित्तरंजन