तुम्ही अतिशय पोटतिडकीने लिहिले आहे. मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.
एक शंका...
"मुठेच्या पात्रात दर २-४ किमी वर पूल बांधून पाण्याचा प्रवाह रोखणे आणि पाणी प्रवाही राहण्यासाठी कुठलीच पर्यायी व्यवस्था न करणे म्हणजे विकास?"
हे माझ्या सामान्यज्ञानाच्या विपरित आहे. माझ्या सामान्यज्ञानानुसार पूल बांधल्याने जलप्रवाह अडवला जात नाही. तुमचे म्हणणे थोडे विस्ताराने समजावून सांगाल का?