सामान्य माणूस नेहेमीच एकटा असतो भोमेकाका... मला हेच तर म्हणायचे आहे. कोकाकोला विकला जातो म्हणून बनवला जातो ही भांडवलशाही पळपुटेपणाची मनोवृत्ती झाली. वाघाच्या अस्थींपासून केलेली औषधे, प्राण्यांच्या कातड्यापासून केलेल्या वस्तू, समुद्रपक्ष्यांच्या घरट्यापासून केलेले सूप वगैरे गोष्टी सुद्धा विकल्या जातातच की. मध्यंतरी डिस्कव्हरी वर गिधाडांच्या घटणाऱ्या संख्येवर एक फिल्म दाखवण्यात आली. गोवंशीय जनावरांना दिल्या जाणाऱ्या एका विशिष्ठ औषधामुळे गिधाडांची मूत्रपिंडे निकामी होऊन हजारोंच्या संख्येने गिधाडे रोज मृत्यूमुखी पडत आहेत. याही गोष्टीसुद्धा विकल्या जातातच. त्यांच्या बाबतीत तर अजून फारशी जनजागृती झालेलीच नाही. या सर्व प्रकरणांमधे ग्राहक आहेत म्हणून चाललय ते चालू दे असे आपण म्हणाल काय?
डी.एस.के यांना माझा पाठिंबा अजिबातच नाही. त्यांनी केलं ते चूकच आहे. सामान्य माणूस रोजरोज रस्त्यावर येऊन आंदोलनं करू शकत नाही. त्यामुळे सध्या ठेविले अनंते तैसेचि रहावे अशी वृत्ती तो धरून आहे. डी एस के प्रभृती बिल्डर लोकांची सुगी मुंबईकर लोकांनी पुण्यात चढ्या भावाने घरे विकत घेण्यास सुरुवात केल्यावर झाली हे जाता जाता ध्वनित करावेसे वाटते. विश्वात काय किंवा सुरात काय, घरे विकत घेणाऱ्यांमधे पुणेकर किती आणि पुण्याबाहेरचे किती याची आकडेवारी काढायला हवी. उद्बोधक माहिती पुढे येईल असे वाटते.
सामान्य माणसांना दोष देत बसण्यापेक्षा ही परिस्थिती सुधारण्यासाठी मला काय करता येईल असा विचार मला करायचा आहे. आपण मला याबाबतीत मार्गदर्शन का करत नाही?
--अदिती