अदिती,

महेश म्हणतात त्याप्रमाणे पुणे हा 'वीक पॉइंट' असल्याने इतके लिहिले. विषय सुरू केल्याबद्दल धन्यवाद !

भोमेकाका,

पूल हे सर्वांच्या सोयीसाठी असले तरी, पूल बांधून झाल्यावरही बांधकामासाठी लागणारा राडारोडा नदीच्या पात्रातच टाकला जातो. जुना पूल पाडून नवीन बांधल्यावर जुन्या पुलाचे अवशेष तिथेच राहून जातात. पात्रातल्या गाळाचा उपसा वरचेवर करावा लागतो तो होत नाही.. त्यामुळे झुडपे, प्लॅ. पि. पुलाच्या खांबापाशी अडून राहतात आणि पर्यायाने पाणी नीट वाहत नाही. म्हणून पूल बांधल्यावर पाणी प्रवाही राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात नाही असे लिहिले आहे.

प्रवासी महाशय,

माझा अभिप्राय केवळ 'वाचनीय' आहे ??? जे मुद्दे अभिप्रायात आहेत त्यातले माझ्यासकट आपल्या सर्वांना जेव्हढे जमतील तेव्हढे कृतीत आणणे अपेक्षित आहे.

ध्रुव,

हो. आम्हीही तशाच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे काम करतो म्हणूनच तर आमचे डोळे उघडले आहेत. म्हणूनच तर वास्तवाची जाणीव झाली आहे. आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरुद्धात नाही. पण जेव्हा बहुराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यात येण्याची परवानगी दिली जाते त्यावेळी पुण्याच्या क्षमतेचा विचार केला जातो का ?? आम्ही यावर बोंब मारत आहोत.

हातात पैसा आला, गाड्या आल्या, राहणीमान सुधारले पण ते मिळविण्यासाठी आपण काय गमावले आहे हे खूप उशीरा दिसायला लागले. ही ओरड स्वतःविरुद्ध आहे.

पुण्यात परिवहन सेवा सुधारली ?? कशी ? प्रत्येकाचे वाहन आल्यामुळे ? सार्वजनिक परिवहन सेवेचे काय ?? रोज रिक्षा किती जणांना परवडते? पी एमटी कधी सुधारली ?? कुठल्या मार्गावरून पी एमटी वेळेवर धावते ?? कुठल्या मार्गावरचे प्रवासी पी एमटी च्या सेवेबद्दल समाधानी आहेत ? हे मी नवीनच ऐकत आहे की पुण्यात परिवहन सेवा सुधारली ! पी एमटी तोट्यात असावी यासाठी बजाज-टाटा वगैरे ची लॉबी तर नसावी.

पुण्यातले किती रस्ते खड्डे-विरहित आहेत ??

माझे वैयक्तीक मत आहे की आज पुण्याची जी स्थिती आहे त्याला आपण स्वतः कारणीभूत आहोत.

प्रत्येकाला आपले घर सुरक्षित हवे असते. मग शेजाऱ्याचे वाटोळं का होईना !  अदिती म्हणते त्याप्रमाणे पुणे सध्या जात्यात आहे. जेव्हा कुठल्याही गावात बाहेरचे लोक उद्योग-धंद्यासाठी येतात तेव्हा त्यांना त्या गावाबद्दल प्रेम असते म्हणून ते येत नाहीत. त्यांना फक्त जास्त पैसा, सुखवस्तू राहणी ची अपेक्षा असते. त्यामुळे अदितीच्या कंपनीतील मद्राशांना इथे नाइट लाइफ नाही , इथे हवे तेव्हढे बार किंवा त्यासारखी ठिकाणे नाहीत म्हणून वाईट वाटते. पण हे आपल्याला आवडेल का ?? आपले भाऊ, बहीण, मुले जर रात्री अपरात्री बार, डिस्कोथेक मधे जाऊ लागले तर ते आपल्याला खपेल का ?? आपण आपल्या प्रिय वस्तुंची/व्यक्तींची काळजी घेतली नाही तर दुसऱ्याला त्याचे सोयर-सुतक नसते. घरात पाहुणे येतात आपण किमती डिनर सेट काढतो. आपल्याच मुलाने जर ताटल्या खेळायला घेतल्या तर दुसऱ्या कडून काय अपेक्षा करायची. पण हेच जर आपण काळजीपूर्वक वापरत आहोत असे दिसले तर समोरची व्यक्तीही आपल्या वस्तू काळजीपूर्वक वापरते. निदान त्यांच्यावर तसा दबाव तरी निर्माण होतो.

हेच आपल्या वागण्यातून 'बाहेरच्यांना' दिसायला हवे.

भोमेकाका,

वस्तू विकल्या जातात.. पण आपणच ठरविले की या वस्तू शक्यतो विकत घ्यायच्या नाहीत तर ? आपल्यापासूनच जर सुरुवात केली तर ? अजून एक घर नाही घेतले तर ? जास्त पैसे मिळतात केवळ या कारणासाठी गावातले घर विकून धनकवडी/माळवाडी/सिंहगड ला राहायला नाही गेलो तर ? सुस्थितीतला वाडा भरपूर पैशांसाठी नाही विकला तर ?? किंवा स्वतःचा वाडा पाडून त्याजागी इमारत बांधण्याऐवजी पुन्हा बहुमजली वाडाच बांधण्याचा आग्रह धरून पुण्याची वाडासंस्कृती टिकविण्याचा प्रयत्न केला तर ?? आपण पाण्याची नासाडी नाही केली तर ?? घरात जास्त पाणी लागणाऱ्या कमोड ऐवजी साधे संडास बसविले तर ?? शॉवर वापरणे टाळले तर ?? शक्य तिथे सायकल वापरणे किंवा पायी जाणे हे पर्याय निवडले तर ?? आपल्या कॉलेजात जाणाऱ्या मुलांना वाहन घेऊन दिले नाही तर ? त्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले तर ? आपण हॉटेलात खाणे कमी केले तर ? मॅकडी, सीसीडी बरिस्ता पिझ्झा वगैरे मधे जाणे सोडले तर (आता म्हणे मॅक्डी मधे पोहे आणि उपमा ठेवणार आहेत ! आपण घरी हेच तर खातो ना ?? ) ? आपण आपल्या मुलांना लेज, चॉकलेट्स, पेप्सी, कोक देणे कमी केले तर ?? आपण नदीत निर्माल्य नाही टाकले तर ? गणपतीचे विसर्जन हौदात केले तर ? चालत्या गाडीतून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आपल्या सहप्रवाशांना तसे न करण्याची विनंती केली तर ??

निदान आपल्या ओळखीतल्या लोकांना सद्यस्थितीची जाणीव करून दिली तर ? पुणे वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पटवू शकलो तर ?? आणि आपण स्वतः त्यासाठी शक्य तेव्हढे प्रयत्न केले तर ? दुसऱ्याला पटविणे खूप अवघड असते. पण आपण जर कृतीत आणले तर आपले पाहून दुसरा आपसूकच तसे करायला लागतो !