आयुर्वेद हे वर्षानुवर्षे जमवलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यातील अनेक गोष्टी ह्या आधुनिक विज्ञानात बसत नाहीत.
अमका पदार्थ उष्ण वा थंड आहे हे आधुनिक उपकरणांनी मोजले जाते का? एखादा नवा खाद्यपदार्थ घेतला तर तो उष्ण आहे की पित्तकारक आहे हे मोजायचे काहीही साधन आयुर्वेदाने सांगितलेले नाही.
समस्त माणसे वात, पित्त आणि कफ अशा तीन गटात विभागली जातात. ती का? आणि कशी? आधुनिक वैद्यक तसाच निष्कर्ष का काढत नाही?
रोगजंतू आणि सूक्ष्मजिवाणू ह्याविषयी आयुर्वेदात काहीही माहिती नाही आणि ह्यामुळे होणाऱ्या रोगांची संख्या अफाट आहे तेव्हा आयुर्वेदाने शरीराचा सखोल अभ्यास केला आहे वगैरे विधाने गैरलागू आहेत. वनस्पती आणि अन्य पदार्थांच्या गुणधर्माचे वर्षानुवर्षे जमवलेले ज्ञान आहे. थोडेफार शरीराचेही ज्ञान त्यात असेल पण आधुनिक वैद्यकाइतके ते विकसित नाही.
आयुर्वेदाने आहार सुचवला आणि लोकांनी तो स्वीकारला इतके ढोबळ घडले असेल असे वाटत नाही. खेडोपाडी अनेक अडाणी लोक रहातात ज्यांना आयुर्वेद शिकवायला कोणी नव्हते. त्यांनी आपापल्या परीने आपला आहार निवडला असेल असे मला वाटते. पुन्हा भारतात इतक्या विविध प्रकारचे हवामान आहे आणि तिथे निर्माण होणारे अन्नही इतके वेगळे आहे की सर्वांना अमकाच आहार योग्य असे सुचवणे गैर आहे. मला नाही वाटत की आयुर्वेद हा इतका सर्वदूर पसरलेला आहे.