प्रिय एकनाथ काका ,

माझ्या चर्चेमुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या ह्या बद्द्ल क्षमा असावी. पण हा खोडकर पणा करण्याचा माझा अजिबात प्रयत्न नाही.

"शाकाहार" म्हणजे जीवांची हत्या असे मी कधीच म्हटले नाही.(हे वाक्य कुठेही माझ्या लिहीण्यात आले असेल तर पुराव्यानीशी पटवून द्यावे)

एक छोटस काम करा ,इतर कुठ्लेही प्रतिसाद न उघडता फ़क्त माझेच ३ ही प्रतिसाद उघडा . आणि तिनही प्रतिसाद एका मागोमाग एक वाचा आणि यानंतर्ही तिघांमध्ये कुठलीही विसंगती आढळल्यास ,मला कृपया निदर्शनास आणून द्या ....

माझा मुद्दा हा पहील्यापासूनच मांसाहार/शाकाहार  करणे ,योग्य की अयोग्य हा नसून आधी म्हटल्याप्रमाणे ,

" शाकाहारी (सगळे नव्हे )लोक जे ,"आपल्या खाण्यासाठी कुणाचा जीव घेण पटत नाही " म्हणून मांसाहार करत नाही ,असे लोक झाडांनासुद्धा,वनस्पतिंनासुद्धा   जीव असतो ही गोष्ट का लक्षात घेत नाहीत किंवा घेत असल्यास ते कुठ्ल्या बाबतीत ह्या दोन जिवांमध्ये फ़रक करतात ?? "

 हा होता ... आणि मी पहील्यापासून हेच म्हटले आहे .

आता तुम्हीच जर ह्या मुद्द्याला वेगळ्या चष्म्यातून बघून त्याला "शाकाहार वि. मांसाहार" असं स्वरूप दिल असेल तर त्याला माझा नाईलाज आहे . आणि आधी म्हटल्याप्रमाणे मी कदाचित मुद्दा व्यवस्थित पदधतीने मांडण्यास कमी पडलो असेन .

माझ्या मुद्द्याला धरून प्रतिसाद दिलेल्या लोकांना मी प्रतिसाद दिलेला आहे . बाकी बरेच जणांनी "शाकाहार वि. मांसाहार " ह्या बाबतीत मते मांडली ,ह्या सगळ्या मतांचा मला खरोखरच आदर असला तरीही मला हवी त्या दिशेने चर्चा होत नव्हती ह्याचाही मला खेद होता . 

असो ,नकळतपणे तुमच्या भावना दुखावल्या असल्यास पुन्हा एकदा क्षमस्व  आणि टीकेबद्द्ल धन्यवाद ( त्याने मला लेखनशैलीत बदल / प्रगती करण्यास नक्कीच वाव मिळेल. )

 योगेश पितळे