ध्रुवराव,
तुम्ही मारलेली कोपरखळी चांगली आहे. पण मला नाही वाटत या चर्चेत पुण्याचा अभिमान चर्चेपेक्षा महत्त्वाचा वगैरे झाला. मी पुण्यात राहते आणि कदाचित हा इथल्या पर्यावरणाचा आणि वातावरणाचाच परिणाम असावा की पुण्याचा अभिमान हा आपोआप निर्माण होतो. मला तो अभिमान आहे. पण दहा वर्षांपूर्वीच्या पुण्याची स्थिती ही आजच्या नाशिक ,नागपूर, रत्नागिरी, तळेगाव वगैरे (मला हीच माहिती आहेत म्हणून ही लिहिली आहेत.) शहरांची आजची स्थिती आहे असे कळले म्हणून हा विषय इथे मांडला. या शहरांनी वाट फुटेल तसे वाढू नये तर ज्याला इंग्रजीमधे plaaned township म्हणतात ती अंगिकारावी आणि पुण्या-मुंबईचं अंधानुकरण करण्याऐवजी जे सर्वात हिताचं ठरेल तेच करावं (उदा. उद्याने, टेकड्या, असल्या तर देवराया यांचे संवर्धन, जुन्या आणि औषधी वृक्षांचे संरक्षण आणि जागा मोकळी करणे अपरिहार्य असल्यास पुनर्लागवड, त्यासाठी मोकळ्या राखीव जागा, जाणीवपूर्वक बांधलेले मोठे रस्ते, सांडपाण्याची
चांगली(च) सोय , नदीपात्राचे संरक्षण , चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इ. गोष्टी )
ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये म्हणातात. पुण्यात उसाचे मूळ नष्ट होत आहे. त्याला जबाबदार कोणीही असोत (मीही त्यात असेन कदाचित) पण ही गोष्ट सत्य आहे.
असो. तुम्ही मांडलेला मुद्दा पुण्याच्या अभिमानाचा होता आणि मला वाटते तुम्ही सुद्धा पुणेकरच असणार कारण पुणेकरांवर विनोद करणे पुणेकरांनाच जमते(पु̮. ल. सुद्धा शेवटी पुणेकरच झाले होते...) आणि हा विनोद हसून स्वीकारणे सुद्धा पुणेकरांनाच जमते. बाकीच्यांनी फक्त ताशेरे ओढावेत आणि पुण्याच्या विकासामुळे आमच्याकडे दुर्लक्ष होते अशी बोंब मारावी ....(किंवा स्वतः अमेरिकेत बसून पुण्याच्या विकासाचा खरा मार्ग कोणता यावर मते ठोकावीत!!!!)(हे सुद्धा हलकेच घ्या मंडळी!)
--अदिती