...पुणेकरांनाच जमते(पु̮. ल. सुद्धा शेवटी पुणेकरच झाले होते...)

-- खरे आहे. "शेवटी"च पुणेकर झाले. हिंदीत एक म्हण आहे, "जब गीदड की मौत आती है.."..पु. लं. च्या बाबतीत दुर्दैवाने तेच झाले असावे की काय??!!

....(किंवा स्वतः अमेरिकेत बसून पुण्याच्या विकासाचा खरा मार्ग कोणता यावर मते ठोकावीत!!!!)(हे सुद्धा हलकेच घ्या मंडळी!)

-- याला म्हणतात शिखंडीमागून शरसंधान!! म्हणजे जन्मानं, कर्तृत्त्वानं मुंबईकर असलो, अमेरिकेत राहूनही पुण्याबद्दल काही वाटते, काहीतरी चांगले होण्याची इच्छा आहे, तळमळ आहे, आयुष्याची प्रत्येक छोटी-मोठी सुटी पुण्यात घालवलेली आहे आणि त्यातून पुणे अनुभवले आहे म्हणून मते मांडावीत आणि "हलकेच घ्या"च्या गोंडस आवरणातून शालजोडीतले आहेर स्वीकारावेत!! असे आहेर फक्त पुणेकरच देऊ शकतात हे सुद्धा समस्त पुणेकरांनी अभिमानानं, छातीठोकपणे सांगावं आणि आम्हा अमेरिकी मुंबईकरांचा हा आहेर "हलकेच" घ्यावा, काय???!!!!!(आणि असे आहेर खुल्या दिलानं, विनातक्रार स्वीकारण्याचा संयम केवळ मुंबईकरातच आहे, पुणेकरात अपवादानंच आढळावा, हे "सुज्ञ" पुणेकरास सांगणे न लगे)

(अनिवासी मुंबईकर)चक्रपाणि