तुम्ही पुलंचे 'मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर' वाचले असेलच! ते म्हणतात त्याप्रमाणे, पुणेकर होण्यासाठी पुण्याचा अभिमान बाळगणं फार महत्त्वाचं आहे.

ध्रुवराव, आपल्या भावना पोहोचल्या पण तपशिलात जराशी चूक राहिली आहे. पुणेकर होण्यासाठी पुण्याचा अभिमान बाळगणं आवश्यक आहे असे नाही, तर "कोणत्यातरी" गोष्टीचा अभिमान, नुसता अभिमान नाही, तर जाज्वल्य अभिमान बाळगणे आवश्यक असते. मग तो आपल्या अळीचा गणपती विसर्जनाच्या रांगेत कितवा? असा देखील चालतो. शिवाय टिळक जयंती दिवशी आगरकरांविषयी अभिमान, क्रिकेटच्या सामना सुरू असताना देशी खेळाविषयी अभिमान.
जाज्वल्य अभिमान का? कारण असा अभिमान मतभेद व्यक्त करण्यात उपयुक्त ठरतो. (पहिली पायरी आठवा, "कुठल्याही गोष्टीत मतभेद व्यक्त करता आले पाहिजेत. आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा कसलाही विचार न करता मत ठोकून द्यायचे")

थोडक्यात असा अभिमान सत्कारणी लागेलच असे नाही असे पुलंना सुचवायचे असावे.

(चूभूद्याघ्या+हघ्या)