अहो लोकसंख्या वाढणे आणि shopping malls होणे म्हणजे सुधारणा आणि प्रगति का ? अजुनही अखिल महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना नोकरीसाठी त्यांच्या मूळ गावाबाहेरच बघावे लागते. मुख्यतः पुणे आणि मुम्बई. आता चेन्नई, हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली, कलकत्ता अशी शहरे आहेत. त्यामुळे शहरे फुगताहेत.
या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावातच योग्य तो रोजगार मिळाला तर इतरत्र येऊन गर्दी करण्याची कुणाचीच इच्छा नसते. पण उद्योगधंदे वाढण्याची दिशा काही मर्यादित शहरांशी निगडीत असते आणि बाकी शहरे मागे पडतात, असे माझे म्हणणे आहे.
बाकी, काळ बदलतोय तसे शहर बदलणे क्रमप्राप्तच आहे. म्हणून विकास होतो असे नाही. जसे काहींचे वय वाढते तसा शरिरात बदल होतो, बुद्धीमत्ता वाढतेच, असे नाही.