असे काय करता अदितीताई,
अहो,
संदर्भ(पु. लं. चे आयुष्य आणि लेखन) आणि आकडे(१५ वर्षे इ.) सोडून न बोलण्याचा इतका आग्रह आहे तर "शेवटी" या शब्दातला संदर्भ सुद्धा स्पष्ट करा की!! संदर्भाविना बोलायला/आहेर करायला आम्हा नॉन-पुणेकरांनाही आवडत नाही.
मुंबईकरांना टोला नव्हता हे वेगळे स्पष्ट करावे लागते यातच टोला आहे/नाही आणि असल्यास कोणाला/नसल्यास का नाही ते कळले नाही का?!
बाकी पुणेकरांची उडवलेली खिल्ली पुणेकरांनीच रसिकतेने ऐकावी यात कवतिक ते काय?! जया अंगी जैसा भाव तया तैसा अनुभव! आणि नॉन-पुणेकरसुद्धा (हो.. आता प्रांतिक आत्मीयता/संलग्नता प्रकट करणे म्हणजे स्वतंत्र चर्चेचा विषय!!)यातून सुटलेले नाहीत हे वेगळे सांगण्याची गरज नाही! प्रांतिक संलग्नता चर्चेत नको असेल तर प्रांतिक दुराभिमान चेतवणारी वाक्ये आणि त्याची परिणती ठरणारे प्रतिसाद हे दोन्ही टाळण्याची जबाबदारी शालजोडीतले जोडे(जोडेच हो, दुसरे काही मला अपेक्षितच नाही!!!) आणि नथीतून तीर मारणाऱ्यांनीच पेलून दाखवावी आणि मग इतरांनाही ती पेलायला शिकवावी हे त्यांना कळले असते तर कदाचित तुम्ही ध्रुवरावांना लिहिलेल्या (आणि कदाचित त्यांनीही लिहिलेल्या) प्रतिसादातील काही आक्षेपार्ह(?!) वाक्ये नक्कीच टाळता आली असती आणि मी सुद्धा प्रतिसाद लिहिण्याचे धाडस केले नसते; पण जोडे आणि तीर मारण्याच्या नादात आपण संदर्भ सोडला आहे याचा साक्षात्कार उशीरानं का होईना पण झाला, हे ही नसे थोडके!!
कृपया राग मानू नये,
लोभ असावा
-- आपला चक्रपाणि