कुळकर्णी महोदय,

किंवा असे म्हणता येईल का की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सशक्त असल्यानेच स्वतःची खाजगी वाहने घरी ठेवणे लोकांना जमू शकते ?

पुण्याचेच उदाहरण घ्यायचे ( दुसरे शहर चर्चेत नाही म्हणून पुण्याचा उल्लेख ! पुणे आणि इतर शहरे अशी तुलना नाही. ) तर तिथल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर कितपत अवलंबून रहाता येईल ? दिल्ली मधेही मेट्रो आत्ता आत्ता सुरु झालीये. बंगलोर, मद्रास इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बोंबच आहे !

त्यामूळे दुचाकी वाहन वापरणे भाग पडत असावे का ?  

हे दुचाकी अथवा स्व-वाहन वापरण्याचे समर्थन नाही तर त्यामागचे कारण शोधण्याचा हेतू आहे.

चर्चेचे वाहन मूळ पदावर यावे ही इच्छा !